आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Naxalism Biggest Challenge Before The Nation, Rudy Speak In The Launching Function Of Divay Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'दिव्य मराठी\'च्या अमरावती आवृत्तीचे थाटात लोकार्पण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - देशातील 650 पैकी 250 जिल्ह्यांमध्ये शासनव्यवस्थेचा अंकुश चालत नाही. दहशतवादापेक्षा देश नक्षलवादाने अधिक त्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय लोकशाहीच्या उपयुक्ततेबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राजीव प्रताप रूडी यांनी केले.

देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह दैनिक भास्करची मराठी आवृत्ती ‘दिव्य मराठी’च्या अमरावती आवृत्तीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शनिवारी प्रकाशन सोहळा थाटात पार पडला. दैनिक भास्करची ही 66 वी, तर ‘दिव्य मराठी’ची ही सातवी आवृत्ती आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, केरळचे माजी राज्यपाल रा. सू. गवई, विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, सामाजिक न्याय व व्यसनमुक्ती कार्य मंत्री अँड. शिवाजीराव मोघे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रावसाहेब शेखावत, महापौर वंदना कंगाले, अमरावतीचे पहिले महापौर डॉ. देवीसिंह शेखावत या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल, ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर, स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर उपस्थित होते.

रूडी म्हणाले, राजकीय लोकशाहीने 65 वर्षांत देशास काय दिले? फक्त 20 टक्के लोकांसाठी शासनव्यवस्था आहे. राजकारण जात, धर्म, वर्ग, पैशाच्या चक्रात अडकले आहे. प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढत असून राष्ट्रीय पक्षांचे महत्त्व कमी होत आहे. राजकीय पक्षांचा प्रभाव घटणे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. म्हणूनच चर्चा आवश्यक आहे.


लहान शहरांचाही विकास झाला पाहिजे : अग्रवाल
भास्कर हा प्रिंट मीडियातील सर्वात मोठा समूह आहे. ‘दिव्य मराठी’ सुरू करताना मला अनेकांनी मोठय़ा शहरांऐवजी लहान शहरांतून का, असा प्रश्न विचारला. देशाच्या विकासात दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई यांसारखी शहरे आहेतच, पण हा विकास लहान शहरांमध्येही झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असे भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांनी सांगितले. ज्या शहरांना चांगल्या वृत्तपत्रांची गरज आहे, तिथे ती दिली पाहिजेत. हे वृत्तपत्र जनतेला घेऊन चालणारे, नि:पक्ष आणि निर्भीड असेल. शहराची प्रत्येक समस्या वृत्तपत्रात उमटून मार्गी लागावी तसेच शहराच्या विकासात योगदान असावे, असेच आम्हाला वाटते. शेतकर्‍यांच्या समस्या दूर करण्याकरिता नेत्यांनी पक्षभेद विसरून काम करावे. भास्कर समूह निश्चितपणे त्यात योगदानासाठी तत्पर आहे, असे अग्रवाल म्हणाले.


लोकशाहीस तडा देण्याचे प्रयत्न हाणून पाडा : देशाच्या दुरवस्थेस संसदीय लोकशाही जबाबदार असल्याचे भासवले जाते. ही व्यवस्था मोडकळीस काढण्याचे प्रयत्न होत असून ते जोरकसपणे हाणून पाडायला हवे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले.

इलेक्ट्रॉनिक मीडिया तरल : लोकप्रतिनिधींना पुस्तके वाचण्यासाठी वेळ मिळत नाही. विधानसभेत वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते समस्या मांडतात. वृत्तपत्र कधीही स्वत:जवळ बाळगता येते. परंतु तसे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे नाही. हा मीडिया तरल असल्याचे प्रा. वसंत पुरके म्हणाले.

जागृती करण्याचे काम वृत्तपत्रांचे : मोघे
स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांसमोर स्वातंत्र्याचे लक्ष्य होते. आता प्राथमिकता बदलल्या. आज तो उदात्त हेतू हरवल्यासारखा भासत आहे. वृत्तपत्रांसमोर जनजागृती, समाजविकासाचे लक्ष्य असावे. ‘दिव्य मराठी’ने वैदर्भीयांना वाचन संस्कृतीचे दज्रेदार व्यासपीठ देण्यासोबतच जागल्याची भूमिका पार पाडावी, असे शिवाजीराव मोघे यांनी म्हणाले.