आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांचा मास्टर माइंड तुरुंगाबाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागूपर - मुंबईतील घातपाती कटात सहभाग असलेला नक्षलवाद्यांचा मास्टर माइंड वर्णन स्टॅनलिस गोन्सालविस उर्फ विक्रम बुधवारी नागपूर कारगृहातून बाहेर पडला. मंगळवारी सत्र न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्याने यापूर्वीच शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्याने त्याची मुक्तता करण्यात आली. तर त्याचा साथीदार श्रीनिवासन याला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी संघटनेच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य श्रीधर कृष्णन श्रीनिवासन आणि वर्णन हे मुंबईत घातपाती कारवायांचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. एक खबर्‍याने दोघेही गोवंडी येथे थांबवल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार एटीएसने त्यांना अटक केली. त्या वेळी त्यांच्याकडून स्फोटके, शस्त्रे, आणि नक्षली चळवळीचे साहित्य जप्त करण्यात आले होते.
ऑगस्ट 2007 पासून दोघेही तुरुंगात शिक्षा भोगत होते. शिक्षा सुनावल्यानंतर वर्णनच्या सुटकेसाठी त्याचा वकील सुरेंद्र गडलिंग यांनी अर्ज केला होता. सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर तुरुंग अधिकार्‍यांनी त्याची सुटका केली.