आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षल भागातील 10 हजार युवकांना रोजगार देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था (एमगिरी)च्या माध्यमातून संशोधन आणि प्रशिक्षणावर भर देण्यात येणार आहे. एमगिरीला संशोधन आणि प्रशिक्षणाचे हब बनवून ग्रामीण भागासोबतच नक्षलग्रस्त भागातील दहा हजार युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मंगळवारी केंद्रीय लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली.

एमगिरीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या जगातील एकमेव संयुक्त पुतळ्याचे अनावरण मुनियप्पा यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष देवेंद्रकुमार देसाई, केंद्रीय सचिव माधव लाल, खादी ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय प्रतापसिंह, संयुक्त सचिव बी.एच. अनिलकुमार, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, कमलेश रस्तोगी, एन.के.भंडारी, प्रेमशंकर अवस्थी, डॉ. नीता मिर्शा, मगन संग्राहलयाच्या संचालक विभा गुप्ता, एमगिरीचे संचालक प्रफुल्ल काळे उपस्थितीत होते.

खादी कापड निर्मिती कें द्राचे झाले उद्घाटन
एमगिरी आणि मगन संग्रहालयाची पाहणी केल्यांनतर ना. मुनियप्पा आणि मान्यवर सेलूला गेले. तेथे सौर ऊज्रेवर निर्मित खादी कापड निर्मिती केंद्राचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी या परिसरातील सौर ऊज्रेवर चरख्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या सूतकताईची पाहणी केली.