आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naxalite Leader Saibaba Out Of Jail For 3 Month's

नक्षली नेता प्रा. साईबाबा ३ महिन्यांसाठी जेलबाहेर, समर्थकांकडून जेलबाहेर स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुंबई उच्च न्यायालयाने तीन महिन्यांचा जामीन मंजूर केल्यानंतर नक्षली नेता प्रा. जी. एन. साईबाबा हा शुक्रवारी दुपारी २ वाजता नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडला. या वेळी त्याच्या स्वागतासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा. साईबाबा हा सीपीआय माओवादी संघटनेचा सदस्य आहे. माओवाद्यांसाठी ताे ‘थिंक टँक’ची भूमिका बजावत होता. ताे दिल्लीत इंग्रजीचा प्राध्यापक होता. गडचिरोली जिल्ह्यात हेम मिश्रा आणि प्रशांत राही या दोन नक्षलवाद्यांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर प्रा. साईबाबाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर पोलिसांनी ९ मे २०१४ रोजी साईबाबाला अटक केली.

‘जेल छळासाठी नाही’
‘गेल्या १४ महिन्यांपासून मी कारागृहात आहे. तेथील प्रशासन आपला मानसिक छळ करीत होते. कधी जेवण दिले तर औषध नाही आणि औषध दिले तर जेवण नाही. कारागृह हे सुधारणेसाठी आहे, त्यांना छळण्यासाठी नाही,’ अशी प्रतिक्रिया प्रा. साईबाबाने दिली. ३१ मार्च रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कुख्यात कैदी पळाल्यानंतर अनेक कैद्यांना मारहाण केली. आपल्याला मारहाण झाली नसली तरी मुख्यमंत्र्यांसमोर एका कैद्याकडे मोबाइल सापडल्याने त्याला बेदम मारले होते. या १४ महिन्यांत सुनावणीला सुरुवात झाली असती तर अनेक सत्ये उघड झाली असती आणि आपण निर्दोष बाहेर पडलो असतो. कारागृहात तुमच्या स्वातंत्र्यावर गदा येते. त्यामुळे बाहेर पडल्यानंतर आपल्या मूलभूत अधिकारांची जाणीव होते, असेही तो म्हणाला.