आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जहाल नक्षली दांपत्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- गडचिरोलीतील अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका नक्षली दांपत्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. चातगाव दलम कमांडर विजय ऊर्फ धनीराम केशरी दुग्गा (२६) आणि त्याची पत्नी चातगाव दलम सदस्य राधा ऊर्फ वसंती मणिराम कोवा (२३, रा. मुंगनेर, धानोरा) अशी नक्षल्यांची नावे आहेत.

२००९ मध्ये विजय हा पेंढरी एलओएस सदस्य आणि राधा ही चातगांव दलममध्ये सदस्य म्हणून सामील झाले होते. त्यानंतर ते अनेक समाजविघातक आणि हिंसक कारवायांमध्ये सहभागी झाले. मरकेगांव चकमक, चिमरीकल चकमक, मंडोली रिठ चकमक, जारावंडी चकमक, कुकुम जाळपोळ, देवराम हिचामी या व्यक्तीस मारहाण असे अनेक गुन्हे विजयविरोधात दाखल आहेत.
बातम्या आणखी आहेत...