आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. ढोणे भाजपात; भुजबळांना धक्का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांनी रविवारी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील विश्रामगृहात हा छोटेखानी समारंभ झाला. माजी आमदार डॉ. ढोणे हे राष्ट्रवादीचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या भाजपप्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो. यावेळी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार हरिश पिंपळे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे एकाही नेत्याने शुभेच्छांव्यतिरिक्त भाषण केले नाही.