आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Internal Politics In Municipal Corporation Amravati

महापालिकेमध्ये राकाँ फ्रंटला पुन्हा धक्का!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गटनेत्याच्या वादामुळे सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास करण्यास भाग पडलेल्या राकाँ फ्रंटला मनपात पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता आहे. बडनेराचे नगरसेवक जावेद मेमन यांच्या नाराजीमुळे हा धक्का बसण्याची शक्यता असून, तेही विरोधी कंपूत जाऊन बसण्याची शक्यता बळावली आहे.

जावेद मेमन यांनी अलीकडेच बडनेरात आमदार रवि राणांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला असलेली गर्दी त्या ठिकाणी केलेल्या वक्तव्यावरून मेमन आता अधिक काळ राकाँ फ्रंटमध्ये राहतील, असे वाटत नाही. त्यांच्या मते, ही स्वाभिमानाची लढाई आहे. आणि मी ज्या गटात आहे, तेथे माझ्या स्वाभिमानालाच धक्का लागत असेल, तर मी का म्हणून त्यांना धक्का देऊ नये, या विचारात ते असल्याचे बोलले जाते. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राकाँच्या तिकिटावर १६ जण विजयी झाले. त्यानंतर इतर नऊ नगरसेवकांच्या मदतीने २३ जणांचा राकाँ फ्रंट हा स्वतंत्र गट तयार झाला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवार निवडण्यात चूक झाली, असे म्हणत संजय खोडकेंनी पक्ष सोडला. त्यापाठोपाठ मनपातील हा फ्रंटही राकाँच्या विरोधात गेला. हा गटही फुटला आणि सुनील काळे यांच्या नेतृत्वात सात नगरसेवकांनी वेगळी चूल मांडली. याच कालावधीत सुनील काळे यांना गटनेते म्हणून नेमले. ते पूर्ववत मिळवण्यासाठी खोडके यांना सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लागले, हे सर्वश्रुत आहे.

ही स्वाभिमानाची लढाई
अविनाश मार्डीकर आमचे गटनेते आहेत. मात्र, त्यांची वागणूक तशी नाही. ते भेदाभेद करतात. याचा फटका मलाही बसला आहे. एकदा त्यांनी माझ्याशी केलेला संवाद मला फार खुपला. त्यामुळे आता तेथे राहण्यात मला स्वारस्य नाही. ही स्वाभिमानाची लढाई आहे. - जावेद मेमन