आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचावात आम्ही अपयशी! मोदी फॅक्टर असेल तर दिल्लीत एकहाती सत्ता का नाही - प्रफुल्ल पटेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - यूपीए सरकारला घोटाळ्यांच्या मुद्दय़ापासून स्वत:चा बचाव करण्यात अपयश आल्याचे वक्तव्य करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. चार राज्यांतील निवडणुकांमधील परिस्थिती आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळी चूल मांडण्यासाठी ही चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तुमसर जवळ चिखला गावात आयोजित एका कार्यक्रमात पटेल यांनी आपल्याच सरकारवर ही तोफ डागली. टू जी घोटाळा किंवा कोलगेटसारख्या प्रकरणांमध्ये सरकारला स्वत:ची बाजूच मांडता आली नाही, असे ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची केंद्राप्रमाणेच राज्यातही आघाडी असून त्यांचेच सरकार सत्तेत आहे. मात्र, अनेक वेळा हे दोन्ही पक्षे आमने-सामने उभे ठाकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपावरूनही दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच वाद झाला. दोन्ही पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी तर अनेक वेळा स्वबळाची भाषा करत, आपलेच महत्त्व विषद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सत्तेत सोबत असणारे हे पक्ष, क्षणातच एकमेकांविरुद्ध बोलण्यासही मागेपुढे पाहत नाहीत, असे चित्र अनेकदा दिसे आहे. त्या पार्श्वभूमीवर पटेल यांनी गोंदियामध्ये केलेले वक्तव्य महत्त्वाचे ठरत असल्याची चर्चा आहे.
आदर्श घोटाळाप्रकरणी विधिमंडळात मांडण्यात आलेल्या अहवालावरून राज्यातील आघाडीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे पटेल या वेळी बोलताना म्हणाले. आपण अद्याप अहवाल पाहिला नसून तो फेटाळायचा की स्वीकारायचा हा राज्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आदर्शची जमीनही राज्य सरकारची असून तिचा लष्कर किंवा शहिदांसाठी ती राखीव नसल्याचेही पटेल म्हणाले. राज्यपालांनी अशोक चव्हाणांविरोधात खटला चालवण्यास परवानगी नाकारण्यामागेही काही तरी कारण असेल, असा बचावही पटेल यांनी केला.
विरोधकही काँग्रेसच्या मुळावर
रविवारी झालेल्या महागर्जना मेळाव्यातही मोदींनी सर्व टीका काँग्रेसवर केली. राज्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावे आली आहेत. मात्र, असे असतानाही मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बोलण्याचे टाळले. त्याउलट संपूर्ण भाषणात त्यांनी विविध घोटाळ्यांसाठी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यामुळे सगळीकडूनच काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहेत, का? असा प्रश्न निर्माण होतो.
मोदी फॅक्टर देशभर नाही
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या बाबत विचारले असता, नरेंद्र मोदी हा एकच फॅक्टर देशभर चालणार नसल्याचे ते म्हणाले. जर भाजपचा तसा दावा असेल, तर दिल्लीमध्ये त्यांना स्वबळाबर सत्ता मिळवणे शक्य का झाले नाही, असा सवाल पटेल यांनी केला. तसेच छत्तीसगडमध्येही त्यांचा अगदी कमी फरकाने विजय झाल्याचे ते म्हणाले. तामिळनाडू, केरळ, ओडिशा, पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये तर भाजपचे नामोनिशाण नसल्याचे पटेल म्हणाले.