आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरचे २८९ पर्यटक सुखरूप, परतीच्या मार्गावर; दोघांशी अजून संपर्क नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागपूर - ‘नेपाळमध्येेपर्यटनासाठी गेलेले नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील सुमारे २८९ पर्यटक परतीच्या मार्गावर असून दूरसंचार व्यवस्था कोलमडल्याने दोघांशी अजून संपर्क होऊ शकला नाही,’ अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांनी दिली. नागपुरातील आरएमएस काॅलनीत राहाणारे श्रीकांत बुदाराम चव्हाण मनोज चव्हाण यांच्याशी अजूनपर्यंत संपर्क झालेला नाही.
नेपाळमधील लामगुंजमध्ये शनिवारी झालेल्या तीव्र भूकंपामध्ये दाेन हजारांहून अधिक लाेकांचा बळी गेला. नागपूर येथील पाच ग्रुप नेपाळला पर्यटनासाठी गेले होते. यात २४० जणांचा समावेश होता. शिवाय ४० ते ४५ जण वैयक्तिकरीत्या गेले होते. भूकंपाची बातमी येताच पर्यटकांचे आप्त नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. िजल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी िजल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करून नागरिकांना तेथे संपर्क करण्याचे आवाहन केले. िजल्हा नियंत्रण कक्षाने खासगी ट्रॅव्हल्स, िवमान तसेच खासगी वाहनाने गेलेल्या पर्यटकांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला. यातील २८९ जणांशी संपर्क झाला असून ते परतीच्या मार्गावर आहेत. त्यांच्या नावांची यादी िदल्लीला कळवली आहे, असे कुंभारे यांनी सांगितले.
दरम्यान शहरात भूकंपाच्या अफवा दुसऱ्या दिवशीही सुरू होत्या. सोशल मीडिया यात आघाडीवर होता. अमुक भागात हादरे बसल्याचे मेसेज व्हाॅटस् अपवर फिरले.
नेपाळमध्ये शनिवारी रविवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या अापल्या भावंडांना ठाण्यातील नेपाळी नागरिकांनी रविवारी अादरांजली वाहिली. या वेळी ठाण्यातील नागरिकही उपस्थित हाेते.

शिवसेना खासदारांकडून एक महिन्याचे वेतन
मुंबई| नेपाळमधीलभूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना अार्थिक साह्य पुनर्वसनासाठी २१ शिवसेना खासदारांनी मदतीचा हात पुढे केला अाहे. या पक्षाच्या सर्व खासदारांनी अापले एक महिन्याचे वेतन या कामी देण्याचा निर्णय घेतला अाहे. नेपाळमधील बांधवांच्या सुरक्षेसाठी अाम्ही प्रार्थना करत अाहाेत. शिवसेनेचे सर्व खासदार पंतप्रधान रिलीफ फंडसाठी एक महिन्याचे वेतन देतील,’ असे टि‌्वट युवा सेनेचे प्रमुख अादित्य ठाकरे यांनी रविवारी केले. शिवसेनेचे महाराष्ट्रात १८ लाेकसभा सदस्य असून तीन राज्यसभा सदस्य अाहेत.

काेयनापरिसरात नाेंद
नाशिक नेपाळमधीललामजुंग मध्ये शुक्रवारी मध्यरात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. ७.९ रिश्टर स्केलवर तीव्रतेची नोंद झाली. या भूकंपाची नाशिकमधील ‘मेरी’च्या भूकंप मापक यंत्रावरही नाेंद झाली. तसेच रविवारी पहाटे कोयना येथे ३.१ च्या रिश्टर स्केलचा भूकंपाच्या धक्क्याची नाेंद झाली. मेरी येथील भूकंप विभागाच्या वैज्ञानिक अधिकारी चारुलता चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नाशिक जिल्ह्यात किंवा राज्यात कोणताही धोका नसल्याचे सांगितले.