आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात आठवडाभरात नवे टोल धोरण - मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - टोल वसुलीबाबत असंतोष लक्षात घेता आठवडाभरात नवे टोल धोरण जाहीर केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली. राज्यात टोलविरुद्धच्या आंदोलनांवर शासन गांभीर्यपूर्वक विचार करत आहे. या विषयावर नवे धोरण तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, कोल्हापुरातील टोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते कामाचे 30 दिवसात फेरमूल्यांकन करावे व नगरोत्थान योजनेतून आयआरबीला पैसे द्यावेत, असा ठराव महापालिकेने मंजूर केला.
वीजदर घोषणा सोमवारपर्यंत
राज्यात वीजदर कमी करण्यासंदर्भात नेमलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचा अहवाल तयार असून सोमवारपर्यंत सुधारित वीजदरांबाबत घोषणा होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतकरी, यंत्रमाग, घरगुती ग्राहकांना सवलत दिली जाते. ती आणखी किती देता येईल, याचा विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.