आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्याला काळीमा: दोन वर्षांच्या भाचीवर मामाचा बलात्कार, चिमुकलीचा घटनास्थळी मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - दिल्लीतील सामुहिक बलात्काराविरोधात देशभर जनाक्रोश होऊनही बलात्काराचे गुन्हे थांबताना दिसत नाहीत. यवतमाळ मधील घाटंजी तालुक्यातील झटाला (दत्तनगर) गावात एका दोन वर्षीय बालिकेवर कुकर्म करण्यात आले. घटनास्थळीच त्या निरागस बालिकेने प्राण सोडले. विशेषम्हणजे हे कुकर्म करणारा तिचा मामा होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालिकेचे आई-वडील सोमवारी सायंकाळी बाहेर गेलेले होते. त्याच एकांताचा गैरफायदा घेऊन शत्रुघ्न मेश्राम या नराधमाने (२१) बालिकेचे वय आणि नात्याचाही विचार न करता तिच्यावर अत्याचार केला.