आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नऊ जलतरणपटू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र; भोपाळ येथे जुलैमध्ये आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अंबानगरीचे नऊ जलतरणपटू भोपाळ येथे जुलै महिन्यात आयोजित ज्युनिअर राष्ट्रीीय वॉटर पोलो स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या नऊही खेळाडूंची राज्य जलतरण प्रशिक्षण शिबिरासाठी वर्णी लागली आहे.
आंतरराष्ट्रीय वॉटरपोलो खेळाडू पूजा कोसे, राष्ट्रीीय खेळाडू संपदा पत्रे, पायल गहाणकरी, निशा बोंडे, सांजली वानखडे आणि कस्तुरी पिंजरकर या मुंबई येथे महाराष्ट्री राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे 25 जून ते सात जुलै या कालावधीत होणार्‍या शिबिरात स्पर्धेची तयारी करीत असून, सुयोग आमगावकर, शिवम गाडगे, सत्यम चौबे हे तीन खेळाडू नाशिक येथे याच कालावधीत आयोजित शिबिरात सहभागी होतील. हे सर्व खेळाडू डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, प्रा. प्रतिमा बोंडे आणि डॉ. योगेश निर्मळ यांच्या मार्गदर्शनात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावावर सराव करतात.

नुकत्याच नाशिक येथे झालेल्या ज्युनिअर राज्य वॉटरपोलो आणि जलतरण स्पर्धेसाठी अमरावती जिल्हा हौशी जलतरण संघटनेतर्फे या खेळाडूंचा संघ पाठवण्यात आला होता. या स्पर्धेतील दर्जेदार कामगिरीद्वारे अमरावतीच्या नऊ खेळाडूंची राज्य संघात निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना एचव्हीपीएमचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, डॉ. सुरेश देशपांडे, सचिव प्रा. माधुरी चेंडके, संचालक डॉ. श्रीकांत चेंडके, अमरावती हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष वसंत हरणे, डीसीपीईचे प्रा. सुभाषचंद शर्मा, संजय तीरथकर, संजय हिरोडे, आशीष हाटेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.