आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषणाचे मोजमाप करून नियंत्रण मिळवणारी "नीरी'ची मोबाइल व्हॅन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीरी संस्थेने तयार केलेली आधुनिक मोबाइल लॅब व्हॅन. ही व्हॅन भारतभ्रमण करणार आहे. - Divya Marathi
नीरी संस्थेने तयार केलेली आधुनिक मोबाइल लॅब व्हॅन. ही व्हॅन भारतभ्रमण करणार आहे.
नागपूर - वातावरणातीलप्रदूषणाचे मोजमाप करून त्याची माहिती तत्काळ उपलब्ध करून देण्यासोबतच प्रदूषणाचा स्तर कमी करण्यात मदत करणारी अत्याधुनिक मोबाइल व्हॅन नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) विकसित केली अाहे. ही अशा स्वरूपाची भारतातील पहिलीच मोबाइल व्हॅन असल्याचा ‘नीरी’च्या संशोधकांचा दावा अाहे. या व्हॅनसाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचे जागतिक पेटंट मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
मागील आठवड्यात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या एमिशन मॉनिटरिंग व्हेइकल अँड कंट्रोल लॅब या मोबाइल व्हॅनचे उद््घाटन करण्यात आले. नॅशनल क्लीन एअर मिशनअंतर्गत केवळ नागपूर शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी ती विकसित करण्यात आली असली तरी आता केंद्रीय मंत्र्यांच्या सूचनेनुसार ती व्हॅन देशभरातील मोठ्या शहरांसाठीही वापरली जाणार अाहे.

स्वदेशी बनावटीची व्हॅन
^व्हॅनचाखर्च लाखांत आहे. त्यासाठी जुन्या व्हॅनचा करण्यात अाला आहे. त्यातील प्रदूषण मोजमाप नियंत्रणाची उपकरणे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहेत. व्हॅनचे काही परफॉर्मन्स स्टडी आटोपल्यावर आम्ही पेटंटसाठी प्रयत्न करणार अाहाेत. -डॉ.पद्मा राव, प्रकल्पप्रमुख, नॅशनल क्लीन एअर मिशन, नीरी
व्हॅनची वैशिष्ट्ये
औद्योगिकघटक वाहनांतून बाहेर पडणारे ५० प्रकारचे घातक वायू धुळीचे मोजमाप अचूकपणे व्हॅनमधील मॉनिटरिंग युनिटच्या माध्यमातून केले जाते.
व्हॅनमधील कंट्रोल युनिटच्या माध्यमातून घातक वायू, धूळ शोषून घेतला जाताे. त्यामुळे प्रदूषणाचा स्तर कमी होतो.
कारखाने, वाहतुकीचे सिग्नल्स, पेट्रोल पंप अन्य अशा सर्वच ठिकाणांवरील प्रदूषणाचा स्तर मोजून कमी करण्यात मदत होते.
औद्योगिक प्रदूषणाचे मोजमाप नियंत्रणाच्या दृष्टीने व्हॅन डिझाइन करण्यात आली अाहे. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी हवी.