आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन गडकरी हे विदर्भातील \'शेर\'; विजय दर्डांकडून नवी उपमा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना 'विदर्भाचा शेर' अशी नवी उपमा दिली. दरम्यान, दर्डा यांनी याआधी मोदींची व आता गडकरी यांची स्तुती केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा यांची चर्चा रंगणार असल्याचे दिसते.

नितीन गडकरी यांच्या पूर्ती कंपनीतर्फे यंदाही दरवर्षीप्रमाणे ‘अ‍ॅग्रो व्हिजन’ या कार्यक्रमाचे नागपूरमध्ये आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाला विजय दर्डा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी दर्डांनी गडकरींचे कौतुक केले.

दर्डा म्हणाले, गडकरी यांनी स्वाभिमान दाखवत भाजपच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मी त्यांचे त्याबाबत अभिनंदन करेन. खरे तर गडकरींनी राजीनामा दिल्याने विदर्भाचे नुकसान झाले आहे हे मान्य. पण समाजात जगताना स्वाभिमान, आत्मसन्मान खूप महत्त्वाचा असतो. नेमके गडकरींनी तो जपत राजीनामा दिल्याने विदर्भातील ते 'शेर' आहेत. विदर्भातील माणूस हा वाघासारखा जगतो, आणि वाघासारखाच मरतो असेही दर्डा म्हणाले.