आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari News In Marathi, Transport Minister, Divya Marathi

इथेनॉलवर धावणाऱ्या भारतातील पहिल्या बसचे नागपुरात लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्टे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘देशात मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलची आयात करण्यात येते. त्यावर वर्षाकाठी ६ लाख कोटी रुपयांचा खर्च होतो. त्यामुळे इंधन आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी भारतात इथेनॉलच पर्याय होऊ शकते. इथेनॉलवर चालणारी वाहने विकसित केल्यास भारताला पेट्रोल, डिझेलची आयात करावी लागणार नाही आणि इंधन आयातीवर होणारा खर्च कमी होऊन तो इतर विकासकामांसाठी वापरता येईल,’ असा वशि्वास केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
इथेनॉलवर धावणारी पहिली बस नागपुरात दाखल झाली. या बसच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
नागपुरात इथेनॉलवरील वाहने धावण्यासाठी इथेनॉलचे पंप उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक इथेनॉलची नरि्मिती करण्यात येते. त्यामुळे इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यात येईल. इथेनॉलवर धावणाऱ्या वाहन नरि्मितीचा कारखाना विदर्भात उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, इथेनॉलवर धावणाऱ्या बसची वैशिष्टे....