आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Raut News In Marathi, Divya Marathi, Rajendra Mulak

‘लँडिंग न झाल्याने येऊ शकलो नाही, मोदी बहिष्कार प्रकरणावर नितीन राऊतांची सारवासारव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘मुख्यमंत्री नागपुरातील पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले, तरी त्यांनी रोहयो मंत्री नितीन राऊत आणि राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना स्वागतासाठी नियुक्त केले होते. आम्ही दोघेही विशेष विमानाने येणार होतो. त्यासाठी दुपारी २ वाजता लँडिंगची परवानगी मागितली होती. परंतु, ‘एटीसी’ने त्या वेळेत परवानगी नाकारल्याने आम्ही आलो नाही’, अशी माहिती स्वत: नितीन राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मात्र सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना मोदींच्या स्वागतासाठी पाठवले होते, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

राजशिष्टाचार हा फक्त एकट्याचा विषय नाही. केंद्र आणि राज्याचे सांघिक विषय आहे. दोघांनीही एकमेकांचा सन्मान करायला हवा. पंतप्रधानांनी अपमान करायचा आणि आम्ही सहन करायचा, असे होणार नाही, असे राऊत म्हणाले.बहुमत असल्याने भाजप सरकार संविधान बदलण्याचे प्रयत्न करत आहे. काँग्रेसला त्यांनी विरोधी पक्षनेते पद दिले नाही. योजना आयोगही ते बदलवत आहे. कसेही करून ते राज्य घटनेच्या चौकटीला धक्का लावण्याचे काम करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.