आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Helping To Farmers, Alleged Ajit Pawar, Manikrao Thackeray

शेतक-यांना वा-यावर सोडले,अजित पवार, माणिकराव ठाकरे यांची सरकारच्या पॅकेजवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - युती सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील एक दमडीही थेट दुष्काळग्रस्त शेतक-यांना मिळणार नाही. शेतक-यांना मदत जाहीर करण्याच्या नावाखाली युती सरकारने तात्पुरती व दीर्घकालीन तरतुदींची आकडेमोड करून मलमपट्टी केली असून शेतक-यांना वा-यावर सोडले, अशी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ७ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील व काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे यांनी टीका केली. ‘हे पॅकेज म्हणजे तात्पुरत्या आणि दीर्घकालीन मदतीच्या नावाखाली शेतक-यांची फसवणूक आहे. आज दुष्काळग्रस्तांना सरसकट कर्जमाफी, वीज बिल माफी आणि हेक्टरी मदतीची गरज आहे. यासाठी विरोधी पक्षांनी १० हजार कोटींच्या पॅकेजची मागणी लावून धरली होती; परंतु सरकारने केवळ पीक कर्जावरचे व्याज आणि वीज बिल माफ करण्याचे जाहीर केले. या पॅकेजमधून शेतक-यांना किती आर्थिक मदत होईल, हे सरकारने स्पष्ट केलेले नाही,’ अशी टीका या नेत्यांनी केली.