आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Relief From Heat In North, Allahabad Records 48.3 Deg C

भट्टी तापली : विदर्भासह उत्तर भारतात उन्हाचा आगडोंब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपुर/पुणे/नवी दिल्ली - मान्सून केरळपुढे सरकला असून दक्षिण भारतातील काही राज्यांत पाऊस पडत आहे. मात्र दुसरीकडे, दिल्ली, जयपूर, नागपूर, भोपाळसह अनेक शहरांत उष्णतेचे विक्रम मोडीत निघाले. राजस्थानातील चुरूमध्ये सर्वाधिक 48.6 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. नागपूरला 47.3 अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात चंद्रपूर व ब्रह्मपुरी सर्वाधिक हॉट शहरे ठरली. ब्रह्मपुरी 47.4, तर चंद्रपूरला कमाल 47.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.

या भागात उष्णतेची लाट
हवामान खात्यानुसार, विदर्भ, मराठवाडा, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, झारखंडचा काही भाग, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशाचा भाग, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे.

उत्तर भारतात हाल-बेहाल
उत्तर भारतात पारा सामान्य तापमानापेक्षा चार ते पाच अंशांनी वाढलेला होता. दिल्लीतील पालममध्ये पार्‍याने 47 अंशांचा टप्पा गाठत गेल्या 19 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. अलाहाबादेत अनेक ठिकाणी तापमान 48 अंकांच्याही वर गेले आहे. राजस्थानातील बहुतांश शहरांत पारा 45 च्या वरच होता. मध्य प्रदेशातही हेच चित्र होते. हरियाणाच्या भिवानीत 48, पंजाबच्या फरीदकोटमध्ये 47 अंश तापमान होते. जम्मूतही पारा 44, तर पूंछसारख्या डोंगराळ भागात त्याने चाळिशी गाठली.

सुटका नाहीच : हवामान खात्याने सांगितले की, सध्या तरी तीव्र उष्णतेपासून सुटका नाही. उलट येत्या तीन-चार दिवसांत पारा आणखीच वाढण्याची चिन्हे आहेत.
नागपुरात 4 दिवसांत 11 जणांचा बळी
उन्हाच्या भट्टीने उपराजधानी नागपुरात उष्माघातामुळे गेल्या चार दिवसांत 11 जण दगावले. शनिवारी दोघांचा मृत्यू झाला. शुक्रवारपर्यंत उष्माघाताच्या बळींची संख्या आठ होती.

राज्याचा पारा
ब्रह्मपुरी (महाराष्ट्र)
47.40
नागपूर 47.3
वर्धा 47.2
चंद्रपूर 47.4
अमरावती 45.6
अकोला 45.2
परभणी 44.9
नांदेड 44.5
औरंगाबाद 41.4
सोलापूर 40.7
जळगाव 43.3
पुणे 37.1
सातारा 35.4
सांगली 35.4
बीड 42
नगर 40
नाशिक 36.9

पुढे वाचा, मान्सून किंचित मंदावला