आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नो टेन्शन..! शहरात वीज भारनियमन नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात सध्या भारनियमन नाही. मात्र, गरजेनुसार ते कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते. दरम्यान, रविवारपासून (दि. 29) पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांच्या रहिवासी क्षेत्रात 30 जुलैपर्यंत भारनियमन होणार नसल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे.
अमरावती शहरात भारनियमन नाही. मात्र, विजेची निर्मिती कमी झाल्यास ‘ए’ ते ‘एफ’ अशा गटांमध्ये भारनियमन होऊ शकते. पंधरा दिवसांपूर्वी अशा प्रकारची परिस्थिती शहरात उद्भवली होती. मात्र, सध्या भारनियमन करण्याची गरज नसल्याचे महावितरणच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी सध्या शहरात विजेचा लपंडाव सुरू असून, या अघोषित भारनियमनाचा फटका अमरावतीकरांना बसत आहे.

गरजेनुसार होईल भारनियमन
४शहरात सध्या भारनियमन नाही. मात्र, गरज भासल्यास भारनियमन होईल. पवित्र रमजान महिना रविवारपासून सुरू होणार असल्यामुळे शहरातील पाच फीडरसह जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांचा रहिवासी परिसराचे फीडर 30 जुलैपर्यंत पूर्णत: भारनियमनमुक्त राहणार आहे.
दिलीप घुगल, अधीक्षक अभियंता.