आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- ‘केंद्रात आमचे सरकार आल्यावर कुठे जाल?’ अशा शब्दांत आयकर अधिका -या ना दम भरणारे भाजपचे माजी राष्ट्री य अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सोमवारी मात्र आपल्या वक्तव्यापासून घूमजाव केले. ‘आयकर अधिका -या ना आपण कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नाही. माझे वाक्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले,’ असे स्पष्टीकरण त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
माहिती अधिकार क्षेत्रातील काही कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या नेतृत्वाखालील विदर्भातील ‘पूर्ती उद्योग समूहा’तील गैरव्यवहाराचे प्रकरण उजेडात आले होते. त्यानंतर आयकर अधिका -या नी या कंपनीची चौकशी होती. दरम्यान, हे प्रकरण शांत झालेले असतानाच भाजपच्या राष्ट्री य अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येचा ‘मुहूर्त’ साधून आयकर अधिका -या नी गडकरींच्या ‘पूर्ती’ उद्योगाशी संबंधित पुण्या, मुंबईतील कंपन्यांवर छापे टाकले होते.
अध्यक्षपदी पुन्हा वर्णी लागणे जवळपास निश्चित असताना ‘पूर्तीविरोधात पुन्हा कारवाई सुरू झाल्याने सावध पवित्रा घेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गडकरींना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली होती. त्यांच्या जागी राजनाथसिंह यांची वर्णी लागली. हा राग मनात ठेवून गडकरी यांनी गुरुवारी नागपुरात आयकर अधिका -या ना इशारा दिला होता.
अधिकारी संघटना आक्रमक
या वक्तव्याविरोधात देशपातळीवरील आयकर अधिका -या च्या संघटनेने संताप व्यक्त करून गडकरींनी माफी मागण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी गडकरी यांनी घूमजाव केले. ते म्हणाले की, आयकर अधिका -या ना मी धमकी दिलेली नाही, उलट त्यांच्या प्रामाणिकपणावर माझा पूर्ण विश्वास आहे. फक्त त्यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊन काम करू नये, एवढीच आपली अपेक्षा आहे. कोणत्याही व्यक्तीची किंवा कंपनीची चौकशी करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, अशी पुष्टीही गडकरींनी जोडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.