आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रीपदे, खातेवाटपाबाबत कुठलीही नाराजी नाही - उध्‍दव ठाकरे यांचे स्पष्‍टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मंत्रीपदे आणि खातेवाटपाबाबत आमची कुठलीही नाराजी नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नागपुरात केले. मंत्री व आमदारांची बैठक घेण्यासाठी ठाकरे शहरात आले होते.

या वेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला चांगले स्थान मिळाले आहे. त्यामुळे मंत्री आणि आमदारांत कोणतीही नाराजी नाही. मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात दुष्काळ व गारपीट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात आपण मंत्र्यांसह विदर्भाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, विदर्भात पराभूत झालेल्या उमेदवारांशी त्यांनी या वेळी चर्चा केली.