आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ‘आधार’वर जन्मतारीखेची नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - आधार कार्डावर आता जन्मतारखेचीही नोंद केली जाणार आहे. यामुळे वयाचा पुरावा आवश्यक असलेल्या सरकारी आणि बिगर सरकारी योजनांसाठी आधार कार्डाचा उपयोग करता येणार आहे.


आरटीआय कार्यकर्ते अविनाश प्रभुणे यांनी सांगितले की, आतापर्यंत आधार कार्डावर फक्त जन्मवर्षच नोंदवले जात होते. आता त्यावर जन्माच्या तारखेची नोंद करण्याबाबत तात्विक सर्वमत तयार झाले आहे. प्रभुणे यांनी हा मुद्दा भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरण (यूआयडीएआय) आणि त्याचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांच्यासमक्ष उपस्थित केला होता. त्यांनी सर्वात आधी नोव्हेंबर 2012 मध्ये यूआयडीएआयचे लक्ष याकडे वेधले होते.