आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी-मराठ्यांमध्ये सरकार लावतेय भांडण; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- ओबीसी समाजाच्या 27 टक्के आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध दर्शवून सरकार मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट निर्माण करत त्यांच्यात भांडण लावत असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केला.

अकोल्यात ओबीसी आरक्षण बचाव परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती तोफ डागली. मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध नाही. मात्र ते आरक्षण ओबीसी समाजाच्या 27 टक्क्यांतून देण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी परिषदेत केली.

राणेंच्या समितीला विरोध : मराठा आरक्षणासंदर्भात उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने जारी केला आहे. ही समितीच नियमबाह्य असल्याचे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.

नेत्यांची वाट पाहून कार्यकर्ते कंटाळले : शनिवारी सकाळी 10 वाजता सुरू होणारी आरक्षण बचाव परिषद प्रत्यक्षात दुपारी तीन वाजेनंतर सुरू झाल्याने राज्यभरातून आलेले कार्यकर्ते कंटाळले होते. परिषद नक्की होणार का, असा प्रश्नही काही जणांनी या प्रसंगी उपस्थित केला. अखेर दुपारी तीन वाजता परिषदेस प्रारंभ झाल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.