आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Olx Dot In Gave Gandhiji Spectator Sell Advertisment

'ओएलएक्स डॉट इन 'वर काढली होती गांधींजींच्या चष्‍मा विक्रीची जाहिरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा - ‘यहा सब कुछ बिकता है’, म्हणणार्‍या इंडियाज लार्जेस्ट मार्केट प्लेस ‘ओएलएक्स डॉट इन’वर महात्मा गांधीजींच्या चष्मा विक्रीची जाहिरात टाकली होती. ‘दिव्य मराठी’ने त्याबाबत वृत्त प्रकाशित करताच पोलिस यंत्रणा कामाला तर लागलीच आहे; पण तीन दिवसांतच ओएलएक्सवरील जाहिरात आता ‘नो लाँगर अव्हेलेबल’ असे दर्शवू लागली आहे. पोलिस यासंदर्भातील तपास अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत आहे.
जुन्या नाण्यांचा व नोटांचा शोध घेताना नागपुरातील एका सद्गृहस्थाला 11 जून 2011 ला ‘ओएलएक्स डॉट इन’वर महात्मा गांधीजींच्या चष्मा विक्रीची जाहिरात दिसली. त्यामध्ये चष्म्याची किंमत पाच कोटी रुपये दर्शवली असून, संपर्काचा पत्ता वर्धमान, नागपूर असा दिला होता. दरम्यान, चष्मा चोरी गेल्याचेही वृत्त सर्वत्र झळकल्याने त्यांनी ती जाहिरात बारकाईने तपासली तेव्हा ‘गांधी गोल्ड प्लेटेड गॉगल-नागपूर-गॉगल ऑफ महात्मा गांधी’ या साइटच्या माध्यमातून जाहिरात टाकल्याचे निदर्शनास आले होते.
त्यामध्ये सुरुवातीला संपर्काचा नंबर आणि त्यात ‘महात्मा गांधीज मिसिंग स्पेक्टॅकल्स आर नाऊ अव्हॅलेबल फॉर सेल अँट आरएस- 5,00,00,000 अँनोनिमस सेलर पुट अँड ऑन,एचटीटीपी:// नागपूर.ओएलएक्स.इन / पिक्चर्स/गांधी-गोल्ड-प्लेटेड-गॉगल-आयआयडी-18407383’ असा उल्लेखही आढळला. याबाबत त्यांनी पोलिस प्रशासनाला मेलद्वारे तक्रार करत त्याचा अनेकदा पाठपुरावा करण्याचाही प्रयत्न केला.
‘दिव्य मराठी’ला ही माहिती मिळताच 1 फेब्रुवारी रोर्जी ‘ओएलएक्स’वर गांधीजींचा तो चष्मा पाच कोटी रुपयांत विक्रीला’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली. या प्रकरणाचा गेल्या तीन दिवसांपासून पाठपुरावा सुरू ठेवला. पोलिस आणि सीआयडी बारकाईने तपास करत असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. दरम्यान सोमवारी ‘ओएलएक्स डॉट इन’ या साइटवर बघितले असता, ही जाहिरात सध्या उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
आता ‘नो लाँगर अँव्हेलेबल’
चष्मा विक्रीच्या जाहिरातीवर एंडेड असे दिसत होते. 3 रोजी साइट बघितली असता, ‘दिज अँड नो लाँगर अँव्हेलेबल’असे दाखवत आहे. त्यामुळे ही जाहिरात सध्या या साइटवर उपलब्ध नसल्याचे दिसते.
‘त्या’ सद्गृहस्थाने मानले धन्यवाद
वारंवार या प्रकरणाची माहिती देऊनही कोणीही दखल घेतली नसल्याने गांधीजींच्या वस्तूंबाबत सारेच उदासीन असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल त्या सद्गृहस्थाने ‘दिव्य मराठी’चे धन्यवाद मानले. या प्रकरणाचा तपास तातडीने लावण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
तपास अंतिम टप्प्यात : याप्रकरणाची माहिती मिळताच तपासला गती देण्यात आली. ‘ओएलएक्स डॉट इन’ वर झळकणारी जाहिरात पाहून कोठून ही जाहिरात आली. याबाबतचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सीआयडीकडून सांगण्यात येत आहेत. तपासाबाबत सर्व माहिती सीआयडीला पुरविली जात असून, तेच तपास करीत आहे, असे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले.