आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Word, One Corporator In Aurangabad Municipal Corporation, New Bill Sanctioned

औरंगाबाद मनपात ‘एक वॉर्ड, एक नगरसेवक’च, नव्या विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये सध्या प्रचलित असलेली बहुसदस्यीय प्रभाग पद्धती बाद करून पुन्हा वॉर्ड पद्धती लागू करण्याची तरतूद असलेले सुधारणा विधेयक लवकरच विधिमंडळापुढे येणार आहे. गुरुवारी रात्री झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे एप्रिलमध्ये होणारी औरंगाबाद मनपाची निवडणूक याच पद्धतीने होणार हे स्पष्ट झाले आहे.
सध्या अनेक महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती आहे. त्याऐवजी पुन्हा ‘एक वॉर्ड एक नगरसेवक’ रचना होणार आहे. विधिमंडळात हे विधेयक संमत झाल्यास महानगर पालिका आणि नगर पालिकांच्या आगामी सर्व निवडणुका याच पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक आणले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.