आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only 9 Women Canbinet Ministers Over 72 Years In Maharashtra

७२ वर्षांमध्ये राज्यात केवळ ९ महिला कॅबिनेट मंत्री, महिला सबलीकरणाची फक्त चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच १९३७ ते २००९ या बहात्तर वर्षांत राज्यात आतापर्यंत केवळ २६ महिलांनाच मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यातही केवळ नऊ महिलांनीच कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. विधिमंडळात महिलांना फारसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही.
२००९ मध्ये आघाडीच्या मंत्रिमंडळात वर्षा गायकवाड या कॅबिनेट व फौजिया खान या राज्यमंत्री होत्या.
२०१४ च्या मंत्रिमंडळातही पंकजा मुंडे या कॅबिनेट व विद्या ठाकूर या राज्यमंत्री आहेत. शुक्रवार, ५ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. त्यात किती महिलांना संधी मिळते, याविषयी उत्सुकता आहे. समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण अशी खाती साधारणत: महिलांना दिली जातात. पण, यापूर्वीच्या महिला मंत्री याबाबतीत निश्चितच सुदैवी ठरल्याचे महिला मंत्र्यांची खाती पाहिली असता दिसून येते. कारण सार्वजनिक बांधकाम,
आरोग्य, शिक्षण, नियोजन, सहकार, मदत व पुनर्वसन, वस्त्रोद्योग, क्रीडा व युवक कल्याण आदी महत्त्वाची खाती या पूर्वी महिलांना मिळाली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, प्रमिला टोपले, शरदचंद्रिका सुरेश पाटील, शालिनीताई पाटील, प्रमिलाबेन याज्ञिक, प्रभा राव, रजनी सातव, शोभताई फडणवीस व डॉ.. विमल मुंदडा यांनी कॅबिनेट मंत्री पद सांभाळले.
प्रतिभाताई पाटील या २७ ऑक्टोबर १९६९ ते ९ मार्च १९८५ इतक्या दीर्घकाळ मंत्री राहिल्या. पूर्वी कॅबिनेट, राज्यमंत्री व त्यानंतर उपमंत्री असायचे. आरोग्य व दारूबंदी खात्याच्या उपमंत्री म्हणून सुरुवात केलेल्या प्रतिभाताईंनी नंतर समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, नगर विकास, गृहनिर्माण, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा पुनर्वसन आदी खात्यांच्या कॅबिनेट मंत्री
म्हणून काम पाहिले.

डॉ.. विमल मुंदडा यांनीही सहकार व वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, महिला व बालकल्याण, क्रीडा व युवक कल्याण, सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची खाती सांभाळली. १९९९ ते २००९ पर्यंत त्या सुरुवातीला युती शासन आणि नंतर आघाडी शासनात मंत्री राहिल्या. रजनी सातव या जून १९८५ ते मार्च १९८६ या कालावधीत कॅबिनेट मंत्री होत्या, तर शालिनी वसंतदादा पाटील यांनीही महसूल, मदत व पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा, बांधकाम आदी विभाग सांभाळले.

राज्यमंत्री, उपमंत्रिपदी केले काम
अॅड. सुलेखा कुंभारे, दमयंती देशभ्रतार, वसुधा देशमुख, शांती नारायण नाईक, मनीषा निमकर, मीनाक्षी पाटील, शोभाताई फडणवीस, यशोधरा बजाज, सुशीला बजाज, विद्या उदय बेलोसे, पार्वती मलगोंडा, डॉ. ललिता राव, ताराबाई वर्तक, पुष्पा हिरे या राज्यमंत्री होत्या, तर डॉ. शालिनी बोरसे व इंदुमती शेठ यांनी उपमंत्री म्हणून काम पाहिले.

पहिले मंत्रिमंडळ
१९३७ मध्ये ब्रिटिशांनी प्रांतांकडे (विभागांकडे) अधिकार वर्ग केले होते. त्यानंतर मार्च १९३७ मध्ये राज्यात पहिली निवडणूक झाली व १७५ सदस्यांची विधानसभा अस्तित्वात आली. कॉंग्रेसला बहूमत मिळाले. मात्र त्यावेळी राज्यपालांकडे अमर्याद अधिकार होते, त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसचे सरकार न बनवता दक्षिण साताऱ्यातून निवडून आलेले अपक्ष धनजी शहा कपूर यांच्या नेतृत्वाखाली ६० सदस्यांचे मंत्रिमंडळ बनवले. मात्र पंडित नेहरू व महात्मा गांधीजींनी नंतर जुलै महिन्यात राज्यपालांच्या अमर्याद अधिकारांवर आक्षेप नोंदवला, तो ब्रिटिशांनीही मान्य करून विधिमंडळाला जादा दिले. त्यानुसार ५ जुलै १९३७ ला नवे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या नेतृत्वाखाली नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले होते.