आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Other State BJP Leaders Stay In Nagpur To Attract Non Marathi Voting

इतर राज्यांतील भाजप नेत्यांचा नागपुरात तळ', अमराठी मतदारांच्या एकगठ्ठा मतांसाठी धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत एक एक मताला महत्त्व असून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरातील अमराठी लोकांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतील भारतीय जनता पक्षाचे नेते नागपुरात डेरेदाखल आहेत.

हिंदी भाषिक राज्यांतून महाराष्ट्रात लोंढेच्या लोंढे येत असल्याचा आरोप अनेक वर्षांपासून होतो. आता अनेक हिंदी भाषिक मुंबई, औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर अशा बड्या शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांचे नावही मतदार यादीत आले आहे. शहरांत ठरावीक भागांमध्ये अमराठी लोकांची लोकवस्ती निर्माण झाली असून अशा मतांकडे दुर्लक्ष करून परवडणारे नसल्याची भावना भाजपच्या गोटात आहे. उलट हजारोंच्या संख्येने असलेल्या अमराठी लोकांची एकगठ्ठा मते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. त्यासाठी इतर राज्यांतील पदाधिकारी, मंत्र्यांसह अमराठी नेत्यांना महाराष्ट्रात पाठवले आहे.