आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Our Target To Disclosed Cotton Half Pant Youth Congress Rajiv Satav

खाकी चड्डीचा पर्दाफाश करणे हेच आमचे लक्ष्य,युवक काँग्रेसचे राजीव सातव यांचा घणाघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - भाजप हा पक्ष संघाच्या इशा-यावर नाचतो. त्यामुळे आता आमचा निशाणा संघावर आहे. येत्या निवडणुकांमध्ये ‘खाकी चड्डी’चा पर्दाफाश करणे हेच आमचे लक्ष्य असेल, असा घणाघात युवक काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांनी बुधवारी रात्री केला.


राष्‍ट्रीय युवक काँग्रेसच्या तीनदिवसीय शिबिराचा समारोप झाल्यानंतर सातव यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरही मंदिर, मशिदीचा वाद पुढे करून धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न नेहमीच संघाच्या माध्यमातून केला जाते. यामुळे महात्मा गांधी यांच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनीही राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ धोकादायक असल्याचे सांगून बंधने आणली होती. आता संघाच्या इशा-यावर भाजप नाचत आहे. संघाने म्हटल्यानंतर पंतप्रधानपदाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होते, असे असताना भाजपपेक्षा सरसंघचालकांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करावे, असेही सातव म्हणाले. पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करून ‘मोदी’ एक्स्प्रेस निघाल्याचे सांगितले जाते. मात्र, ज्यांना स्वातंत्र्यदिन व गणतंत्रदिन यांतील भेद कळत नाही, ती एक्स्पे्रस ‘फेक’च समजावी लागेल, असे सातव म्हणाले.