आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे तर नेमाडेंचे लक्ष वेधून घेण्याचे उद्योग, पाडगावकर यांचे नेमाडेंना उत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्याेग’ या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्याचा प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी रविवारी समाचार घेतला. "नेमाडेंचे हे स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचे उद्योग आहेत, असे उद्याेग ते नेेहमीच करत असतात,' अशी टीका पाडगावकरांनी केली.

घुमान येथील साहित्य संमेलनात खूप उचंबळून यावे, असे काहीच नव्हते वा तेथे खूप उत्साह होता असे मला काही वाटले नाही. मला निवडणूक लढवून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायचे नाही. त्यापेक्षा मी घरीच सुखी आहे. आजपर्यंत मी कोणत्याही साहित्य संमेलनाला स्वत:हून कधीच गेलो नाही. अपवाद गोवा साहित्य संमेलनाचा. मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते माझे अत्यंत आवडते कवी कुसुमाग्रज या संमेलनाचे अध्यक्ष होते. म्हणून तेथे गेलो होतो, ही अाठवणही त्यांनी बाेलून दाखवली. आपल्याकडे शाळा, महािवद्यालयातून शेक्सपिअर शिकवला जातो, पण भवभूती वा कालिदास शिकवला जात नाही, अशी खंतही पाडगावकरांनी या वेळी बाेलून दाखवली.

ब्रिटिश शिकला मराठी
पाडगावकरांनी शेक्सपिअरच्या तीन नाटकांचा मराठीत अनुवाद केला. हे
माहीत झाल्यावर इंग्लंड येथील शेक्सपिअर स्मारकाच्या अध्यक्षाने त्यांना खास अापल्या देशात बाेलावून घेतले. पाडगावकरांनी अनुवादित केलेली तिन्ही नाटके तिथे भेट दिली. हा ब्रिटिश अध्यक्ष स्वत: मराठी शिकला व त्याने पाडगावकरांना त्यांच्या अनुवादित पुस्तकातील उतारे वाच्ून दाखवले, अशी आठवण पाडगावकरांनी सांगितली.

सेक्सपिअर...
एका महाविद्यालयात मी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे मी मराठीत भाषांतर केले आहे, पण सूत्रसंचालन करणारी पोरगी सारखी पाडगावकरांनी ‘सेक्सपिअर’च्या नाटकांचे भाषांतर केले, असे सांगत होती. आपल्याला आपले कवीही नीट माहिती नाही आणि िवदेशी कवींिवषयीही परिपूर्ण माहिती नाही. आता मी ८६ व्या वर्षी काय सेक्सपिअर करणार आहे, असा सवाल पाडगावकरांनी केला.