आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाने मागितला अहवाल, पीडीएमसीतील डीनपदाचा वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात मागील काही िदवसांपासून सुरू असलेल्या डीनपदाचा वाद पुन्हा एकदा आरोग्य विज्ञान विद्यापीठात पोहोचला अाहे. त्यामुळे डीनपदाच्या कार्यवाहीचा अहवाल अभिप्राय विद्यापीठाने तत्काळ मागवला असून, त्यासंबंधीचे पत्र श्री शिवाजी शिक्षण संस्थेला पाठवले आहे.


मागील आठवड्यात घडलेल्या प्रकारानंतर डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचविांकडे ई-मेलद्वारा तक्रार केली होती. याच तक्रारीच्या आधारे कुलसचवि डॉ. गरकल यांनी ही विचारणा केली आहे. यामुळे हा वाद पुन्हा विद्यापीठात गेल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाने डॉ. सोमवंशी यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश िदले आहे. मात्र, या निर्णयानंतरही श्री शिवाजी शिक्षण संस्थेने डॉ. सोमवंशी यांना रुजू करून घेतले नाही. या आशयाची तक्रार डॉ. सोमवंशी यांनी एप्रिलला कुलसचविांकडे केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत कुलसचवि डॉ. गरकल यांनी हेच पत्र यथायोग्य कारवाईस्तव संस्थेला पाठवून कार्यवाहीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या पत्राची प्रतिलिपी डॉ. सोमवंशी यांनासुद्धा मिळाली होती. त्यांनीच दै. 'दिव्य मराठी'ला हे पत्र दिले आहे.

आता पोलिस आयुक्तांकडे जाणार
मागीलआठवडाभर पीडीएमसीत गेलो. मात्र, संस्थेने रुजू करून घेतले नाही. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे तक्रार केली होती. त्यांनी संस्थेला अहवाल अभिप्राय मागितला. सोमवारी (दि. १३) पोलिस आयुक्त सुरेश मेकला यांची भेट घेणार आहोत. डॉ.पद्माकर सोमवंशी.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाने श्री शिवाजी शिक्षण संस्थेला पाठवलेले हेच ते पत्र.
बातम्या आणखी आहेत...