आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टगेगिरीविरुद्ध लढ्याचा निर्धार पंकजाच्या यात्रेत संघर्षाचा संकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा- राजकारणातील टगेगिरीविरुद्ध लढण्याचा संकल्प करत पंकजा पालवे-मुंडे यांनी सिंदखेडराजा येथून संघर्षयात्रेला सुरुवात केली. ज्यांनी गोपीनाथ मुंडेंना जिवंतपणी यातना दिल्या, त्यांना मृत्यूनंतर पुळका येत आहे. त्यांना त्यांची जागा दाखवा, असे सांगत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही शरसंधान केले.

वीरमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन पंकजांनी सिंदखेडराजा ते चौंढी या आपल्या संघर्ष यात्रेला सुरुवात केली. ‘मुंडे साहेब म्हणाले होते भगवानगडावरून मला पंकजा दिसते,

आज त्यांच्या अनुपस्थितीत मला त्याच भगवानगडावरून त्यांचे परिवर्तनाचे स्वप्न दिसते, आणि तेच स्वप्न साकार करण्यासाठी मी निघालेय' असे त्यांनी यावेळी सांगितले.

त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनाही या वेळी उजाळा दिला. माझ्या आयुष्यातले वैभव मी पाहिले आहे, पण आता पित्याच्या मृत्यूनंतर मला वैराग्य आले आहे. त्यामुळे आता माझे उर्वरित आयुष्य तुमच्या सेवेसाठी सत्कारणी लावणार आहे. राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन पंकजा यांनी जनतेला केले.