आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरी-पवार रिक्षातून एकत्र सफर करतात तेव्‍हा...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राजकारणातील कट्टर प्रतिस्‍पर्धी कधीकधी एकत्रही येतात. असे नेते जेव्‍हाही एकत्र येतात, तो क्षण अतिशय खास असतो. महाराष्‍ट्रातील दोन प्रतिस्‍पर्धी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राष्‍ट्रीय अध्‍यक्ष नितीन गडकरी एका कार्यक्रमात एकत्र आले. त्‍यावेळी सौर उर्जेवर चालणा-या रिक्षात बसून त्‍यांनी एकत्र सफर केली.

'ऍग्रो व्हिजन 2013' हे प्रदर्शन नागपुरात आयोजित करण्‍यात आले आहे. त्‍यात केंद्रीय कृषीमंत्री या नात्‍याने शरद पवारांनाही आमंत्रण देण्‍यात आले होते. पवारांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट दिली. यासाठी पवार विशेष विमानाने पुण्‍याहून नागपुरात दाखल झाले. ही भेट अनपेक्षित होती. पवारांच्‍या नियोजित दौ-यामध्‍ये हा कार्यक्रम नव्‍हता. प्रदर्शनादरम्‍यान पवार आणि गडकरी यांनी सौर उर्जेवर चालणा-या रिक्षाची सफरही केली.