आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peace, Non Violence, With The World Famous Gandhi Ashram Sadhika Cedkhani

महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात महिलेचा विनयभंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापुकुटी दिवसेंदिवस वादाच्या भोव-यात सापडत आहे. तीन वर्षांपूर्वी महात्मा गांधीजींचा चष्मा चोरी झाला होता. त्यानंतर पर्स चोरी आणि आता ताजे प्रकरण महिला कर्मचा-याच्या विनयभंगाचे घडले आहे.

अशा घटनांमुळे सेवाग्राम आश्रमाची प्रतिमा मलिन होत आहे. शांती, अहिंसा यासाठी ओळखल्या जाणा-या गांधीजींच्या आश्रमात एकमेकांवर चिखलफेकीचे राजकारण सध्या सुरु आहे. दरम्यान गुरुवारी रात्री एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला.

बापुकुटीजवळ एक महिला आणि एक तरुण बोलत उभे होते. त्याचवेळी जालिंदर कन्नोडे तिथे पोहचला आणि माझ्या भाच्यासोबत काय बोलत होती, असे विचारत तिच्यावर हात उगारला. बुटाने मारण्याचा प्रयत्न केला. महिलेची ओढणी ओढत तिला लज्जीत केले गेले.

महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून आश्रमातील इतर लोक धावत तिथे आले आणि त्यांनी जालिंदरला पकडले. १ मार्चला महिलेने जालिंदर विरोधात सेवाग्राम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३५४, ३२३, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.