आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरातील पेट्रोल पंप स्फोटात जळून खाक, नागरिकांची धावपळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपुरातील वाडी येथील एच. पी. पेट्रोल पंपाला शनिवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. घटनेनंतर अिग्नशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली.
नागपूर - नागपूरच्या वाडी रोडवरील पेट्रोल पंपावर भीषण स्फोट होऊन पंप जळून खाक झाल्याची घटना शनिवारी घडली. वर्दळ, वस्ती असलेल्या भागात हा पेट्रोलपंप असून, संपूर्ण पेट्रोल पंप आगीच्या ज्वाळांनी वेढल्याचे दिसताच एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, पंपावर टँकरमधून पेट्रोल भरण्यात येत असताना अचानक हा स्फोट झाल्याचे
सूत्रांनी सांगितले. वाडी रोडवरील पेट्रोल पंपाला आग लागल्याची माहिती मिळताच काही मिनिटातच अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.

मुंबई-हावडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंप वर्दळीच्या रस्त्यावर असल्याने आग भडकताच काही वेळासाठी वाडी रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.