आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi At Mumbai, Rss, BJP Meet, News In Marathi

विधानसभेसाठीही संघ ‘दक्ष’; भाजपला पाठबळ, पंतप्रधान मोदी आज मुंबईत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/मुंबई- लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठबळ देऊन घवघवीत यश मिळवून देणारा रा.स्व. संघ परिवार राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीही ‘दक्ष’ झाला आहे. राज्यातही भक्कमपणे भाजपच्या पाठीशी राहण्याचे संकेत संघाच्या नागपुरात झालेल्या बैठकीतून मिळाले आहेत. हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेनेशी झालेली युती अभेद्य ठेवण्याचे मत भाजपच्या काही नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केले आहे. बैठकीला नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील चार केंद्रीय मंत्री हजर होते.
नागपुरात रेशीमबाग परिसरात शनिवारपासून चाललेल्या बैठकीचा रविवारी समारोप झाला. या वेळी सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती होती. भाजपतर्फे गडकरी, दानवे, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल हे केंद्रीय मंत्री हजर होते. परिवारातील संघटनांचे स्वतंत्र अस्तित्व राहत आले तरी अनेक महत्त्वाच्या विषयांवर एकत्रितपणे काम करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा भागवत यांनी या वेळी व्यक्त केली. लोकसभेच्या वेळी मतदारांनी दाखवलेला विश्वास दृढ कसा करता येईल, यावर चर्चा झाली. यासाठी लोकोपयोगी कामे आणि योजना राबवून भाजपला आणि एनडीएला हे यश टिकवून ठेवावे लागेल, असे मत बैठकीत मांडले गेले. राज्य विधानसभेत बहुमताने सत्ता कशी मिळवता येईल, यावरही सल्लामसलत झाली.
पुढील स्लाइड्‍वर वाचा, नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज भाजपची बैठक