Home »Maharashtra »Vidarva »Nagpur» Poet Grace Is Guide Of Ph D. Of Nagpur University

कवी ग्रेस अजूनही पीएच. डी.चे गाइड

प्रतिनिधी | Jun 16, 2012, 11:22 AM IST

  • कवी ग्रेस अजूनही पीएच. डी.चे गाइड

नागपूर: नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने दिवंगत प्राध्यापकांची नावे पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून आपल्या संकेतस्थळावर आणि माहिती पुस्तिकेत तशीच ठेवली आहे. यात एक नाव प्रसिद्ध कवी माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांचेही आहे. ग्रेस यांचे नुकतेच निधन झाले असले तरी कला शाखेत डॉक्टरेट करणार्‍यांसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांचे नाव विद्यापीठाच्या संकेतस्थावर अजूनही दिसते. विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू मधुकर रोडे यांचे 12 नोव्हेंबर 2010 रोजी अपघाती निधन झाले. त्यांचेही नाव अजून वाणिज्य शाखेतील पीएच. डी. पर्यवेक्षकांच्या यादीत आहे. परीक्षा नियंत्रक सिद्धार्थ काणे म्हणाले की, या विषयावर बर्‍याचदा चर्चा झाली असली तरी पुढे काहीच झाले नाही. रिसर्च रेकग्निशन कमिटीने ही बाब अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिली पाहिजे.

नागपूर विद्यापीठातर्फे ग्रेस यांच्या स्मृतिनिमित्त सुवर्णपदक
अलम दुनियेतील दु:खे संपवणारा कवी
ग्रेस यांच्या कवितांची भरली ‘अलंकारशाळा’

Next Article

Recommended