आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाच्या सर्जा-राजाचा साज महागला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बळीराजासोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाचा पोळा सण अवघ्या काही दविसांवर आला आहे. मात्र, अगोदरच पावसाच्या लहरीपणाने घायाळ झालेल्या शेतकरीराजास बैलांच्या साजाचे साहति्यातील १५ टक्के महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

दुष्काळी परिस्थतिी आणि महागाईच्या सावटात बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण पावसावर अवलंबून आहे. मात्र, त्याने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी तोंडघशी पडला आहे. त्याचे अर्थकारण विस्कटले आहे. दरम्यान, पोळ्यासाठी बाजारपेठ सजली आहे. आपल्या लाडक्या सर्जा-राजाला सजवण्यासाठी साहति्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची पावले बाजारपेठेकडे वळू लागली आहे. मात्र, महागाईच्या पार्श्वभूमीवर यंदा सण केवळ औपचारिकताच असल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

पुरणपोळीचा नैवेद्यही महागला : पोळ्याच्या दवशिी बैलांना आकर्षक रंगांनी रंगवून, कापडी झूल चढवून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. प्रत्येक कुटुंबातील महिला भगिनी बैलांना आेवाळून तसेच पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य देतात. मात्र, यंदा पुरणपोळीसाठी लागणारी हरभरा दाळ व गुळाच्या दरातही वाढ झाल्याने नैवेद्यही महागला आहे.
पाऊस अाला तर सणाचा अानंद
कास्तकारांसाठी पोळा हा सण महत्त्वाचा असतो. परंतु यंदा पावसाने दडी मारल्यामुळे उत्साहावर विरजण पडले आहे. केवळ आैपचािरकता म्हणून हा सण साजरा करणार. येत्या दोन दविसांत पाऊस आल्यास सणाचा आनंद दि्वगुणीत होईल. मागील वर्षाच्या मानाने यंदा पावसाने दडी मारल्याने शेतीचे काहीच उत्पन्न हाेणार नाही. याचा माेठा फटका बसणार असल्याचे दिसते. यामुळे सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचा विचार आहे.
राजेश पेठे, सावंगा, शेतकरी