आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी कोंबणार्‍या 19 स्कूल व्हॅनला ‘पोलिसी’ हिसका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विद्यार्थ्यांना वाहनांमध्ये कोंबून बेदरकारपणे वाहतूक करणार्‍या 19 स्कूल व्हॅनविरुद्ध शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. वाहतूक शाखेचे निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली.
कठोरा जकात नाका आणि चांगापूर फाटा तसेच शहरातील अनेक ठिकाणी एकाच वेळी पोलिसांनी 40 स्कूल व्हॅन अडवल्या. यातील 19 व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक योग्य प्रकारे होत नव्हती. चालकाचे लायसन्स, वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र, प्रदूषण प्रमाणपत्र, विमा, विद्यार्थ्यांची संख्या आदी सर्व बाबी तपासण्यात आल्या. त्यात दोषी आढळलेल्या 19 व्हॅनचालकांना मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंड ठोठावण्यात आला. यातील काही वाहनांतून बेकायदा विद्यार्थी वाहतूक होत असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी चालकाविरुद्ध गंभीर कारवाई केली.
वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक आशीष रोही, नीलेश पाटील यांनी आपल्या पथकासह कठोरा जकात नाका परिसरात तपासणी मोहीम राबवली. उपनिरीक्षक गोपाल उपाध्याय आणि महादेव मांजरमकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह चांगापूर फाटा परिसरात तपासणी केली. पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील आणि त्यांच्या पथकानेदेखील शहरातील उर्वरित भागात वाहनांची तपासणी केली.