आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपायुक्तांनी पकडला अट्टल चोरटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिसांनी मागील चार दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकरणांतील चोरट्यांना पकडून चोरीचा माल जप्त केला आहे. वाठोडा शुक्लेश्वर येथून अ‍ॅल्युमिनियमची तार चोरणार्‍या दरोडेखोरांकडून 23 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्री उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी स्वत: एका अट्टल घरफोड्याला पकडले. फ्रेजरपुरा पोलिसांनी त्या माध्यमातून आणखी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याने पोलिसांना ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसून येत आहे.
अमित राजेंद्र केने (23) याला फ्रेजरपुरा उपायुक्तांनी पकडला अट्टल...
पोलिसांनी अटक केली. अमित आणि कुंदन आनंदराव जोंधळे (29, दोघेही रा. बेनोडा, अमरावती) अशी उपायुक्त घार्गे यांनी चालक व अंगरक्षकाच्या मदतीने पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत. अमित केने अट्टल चोरटा असून यापूर्वी राजापेठ, फ्रेजरपुरा, बडनेरा ठाण्यांच्या हद्दीत; तसेच कोल्हापूर, पुणे, नागपूर, अकोला, यवतमाळ या शहरांमध्येही चोर्‍या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मध्यरात्री त्याला अटक करताच त्याचे सहकारी कुंदन, मच्छी ऊर्फ आशीष शेंडे, बेंडा ऊर्फ दीक्षांत भोंगे, किटूक ऊर्फ अंकुश गायकवाड, ब्लॅकी ऊर्फ मुकेश केने यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. अमितने अलीकडे राजापेठ, बडनेरा आणि फ्रेजरपुरा ठाण्यांच्या हद्दीत तीन चोरींची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 15 ते 20 घरफोड्या उघड होण्याची शक्यता उपायुक्त घार्गे यांनी वर्तवली आहे. याचवेळी अमितकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली.
तीन वर्षांपासून हवा होता अमित
उपायुक्त सोमनाथ घार्गे गुरुवारी रात्री गस्तीवर असताना चालक संतोष भिसे, अंगरक्षक राम भुमे यांच्यासह ते बेनोडा परिसरात पोहोचले. ते नागरी वस्तीत फिरत असताना अमित एका ठिकाणी उभा आढळला. त्याला हटकले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पळण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्याला पकडून फ्रेजरपुरा पोलिसांत आणण्यात आले. चौकशीनंतर त्याने सर्व सहकार्‍यांची नावे घेतल्यानंतर पोलिसांनी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. बेनोडा भागात मैत्रिणीला भेटण्यासाठी मध्यरात्री आला होता.