आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर बार कौन्सिलच्या जयस्वाल यांच्यावर मारहाणप्रकरणी गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात पोलिस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी नागपूर बार कौन्सिलच्या अध्यक्षावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संदीप जयस्वाल असे या अध्यक्षाचे नाव आहे. न्यायालयाच्या परिसरात नागपूर बार कौन्सिलचे काही वकील गोळा झाले होते. या वेळी महिला वकील योगिता चौधरी गाडीवरून याठिकाणी आल्या. येथेच पोलिस शिपाई प्रकाश पराते यांचा वाद झाला. त्यानंतर न्यायालयाच्या परिसरात असलेल्या वकिलांनी परातेसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. याबाबत जयस्वाल आणि पराते यांच्या परस्पर तक्रारीवरून दोघांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.