आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसच तपासणार आता दोन लाखांवर उत्तरपत्रिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत असल्याने पोलिसांपुढे पेच निर्माण झाला आहे. यातील खरे सत्य बाहेर काढण्यासाठी आता अभियांत्रिकी शाखेच्या संपूर्ण उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या कामाला सोमवारपासून (दि. १३) सुरुवात होणार असून, ५५ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हविाळी परीक्षेत अभियांत्रिकी शाखेच्या दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिलेल्या संपूर्ण उत्तरपत्रिका तपासणीसाठी पोलिस यंत्रणेला किमान २० दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती वशि्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका पोलिस तपासण्याची ही अमरावतीच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

अमरावती विद्यापीठातील गुणवाढीच्या प्रकरणात २१ मार्चला फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर १० एप्रिलपर्यंत पोलिसांनी सहा विद्यार्थी, तीन कंत्राटी सहायक मूल्यांकन अधिकारी, तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांसह अन्य दोघे अशा एकूण पंधरा जणांना अटक केली आहे. अटकेत आलेल्या प्रत्येकाकडून पोलिसांना नवनवीन माहिती पुढे येत होती. त्या दशिेने पोलिसांचा तपास पुढे सुरू होता. सुरुवातीला नऊ विद्यार्थ्यांच्या बारा उत्तरपत्रिकांमध्ये खोडतोड, त्यानंतर यांपैकीच चार विद्यार्थ्यांच्या आणखी चार उत्तरपत्रिकांमध्ये खोडतोड असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे २१ दविसांपासून पोलिसांचा तपास निरंतर सुरूच आहे. रवविारी पोलिसांना मिळालेली माहिती धक्कादायक आहे. या माहितीमुळे पोलिसांनी आता अभियांत्रिकीच्या सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा धाडसी ऐतिहासिक निर्णय घेतला. हविाळी २०१४ मध्ये विद्यापीठांतर्गत जवळपास दोन लाख ९०० विद्यार्थ्यांच्या बी. ई. तर नऊ हजारांवर एम. ई. च्या उत्तरपत्रिका आहेत. या संपूर्ण उत्तरपत्रिका तपासण्यासाठी सोमवारपासून पाच पोलिस अधिकारी ५० कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. दरदवशिी कमिान १० ते १२ हजार उत्तरपत्रिका तपासण्याचे काम या पोलिसांना करावे लागणार आहे. यानुसार, आगामी १५ ते २० दविसांत संपूर्ण उत्तरपत्रिका तपासल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.


अशी होणार तपासणी
पोलिसकर्मचारी अधिकारी हे उत्तरपत्रिकांची तपासणी करताना कोणत्या उत्तरपत्रिकेमध्ये कोणत्या प्रश्नाचे उत्तर कसे लिहिले आहे, हे मुळीच तपासणार नाहीत. मात्र, या उत्तरपत्रिकेमध्ये खोडतोड झाली आहे का? झाली असल्यास कशा पद्धतीने केली गेली. गुण लिहिले आहे, त्या ठिकाणी खोडतोड आहे का? या बाबीची प्रत्येक उत्तरपत्रिकेवर तपासणी होणार आहे. यासाठी पोलिस मुख्यालयातील ५० कर्मचाऱ्यांची नविड केली जाणार आहे.


....म्हणूनच घेतला संपूर्ण पेपर तपासणीचा निर्णय
पोलिसांनीअटक केलेल्यांपैकी एकाने एका मोठ्या माशाचे नाव घेतले आहे. संबंधित माशाने मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिकांमध्ये गुणवाढ केल्याचा संशयसुद्धा त्याने पोलिसांपुढे व्यक्त केला आहे. ही बाब पडताळणी करणे आवश्यक आहे त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णय तातडीने घेतला आहे.