आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - शहरातील सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस उपायुक्तांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलिस शिपायाने डोक्यात गोळी झाडून सोमवारी आत्महत्या केली. घडली. सोनू पारखे (२८) असे शिपायाचे नाव असून तो यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होता. सोनू विशेष पोलिस शाखेचे पोलिस उपायुक्त विजय पवार यांच्या बंगल्यावर तैनात होता. मे २०१४ मध्ये त्याने लग्न केले. लग्नानंतर कौटुंबिक वाद वाढले. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याने स्वत:कडील बंदुकीतून डोक्यात गोळी झाडली. त्याचा जागीच
मृत्यू झाला.