आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळमध्‍ये डोक्यात गोळी झाडून पोलिसाची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - मैत्रिणीसोबत झालेल्या वादात एका पोलिस शिपायाने डोक्यात रिव्हॉल्व्हरची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री बारा वाजता पळसवाडी पोलिस वसाहतीत घडली.


वणी येथील राहणारा विशाल पोटदुखे (27) हा यवतमाळ पोलिस मुख्यालयात कार्यरत होता. जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांच्या सुरक्षेसाठी त्याला तैनात करण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री त्याने पळसवाडी पोलिस वसाहतीत स्वत:च्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या वेळी त्याची मैत्रीण वृषालीही हजर होती.


तिने दिलेल्या माहितीनुसार, विशालने रात्री तिला घरी बोलावले होते. काही विषयांवर त्यांच्यात वाद झाला तेव्हा विशालने रिव्हॉल्व्हर काढून थेट डोक्यात गोळी घालून घेतली. काही क्षणातच तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला व जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
घटनास्थळावरील रिव्हॉल्व्हर ताब्यात घेण्यात आली आहे. अधिक चौकशीसाठी वृषालीला ताब्यात घेण्यात आले आहे. तूर्तास आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.