आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशन ड्यूटीवरील पोलिसाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - हिवाळी अधिवेशन काळात बंदोबस्तासाठी वर्धा येथून नागपुरात दाखल झालेल्या एका पोलिस शिपायाचा गाडीत झोपलेल्या अवस्थेतच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री पोलिस मुख्यालय परिसरात घडली. सुधाकर गंथळे असे मृत पोलिसाचे नाव आहे. गंथळे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिस ठाण्यात वाहनचालक आहेत.
बुधवारी ते काही संगणक घेऊन टाटा सुमो गाडीने नागपुरात आले होते. या वेळी त्यांनी पोलिस मुख्यालयात संगणक सोडले आणि बंदोबस्तसाठी हजेरी लावली. यानंतर त्यांनी मुख्यालयातच गाडी उभी केली. रात्रीच्या सुमारास ते गाडीतच झोपले. यातच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी गाडी रिपोर्ट करतेवेळी गंथळे यांचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी दरवर्षी
बाहेरगावाहून येणा-या पोलिसांचे हाल होत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.