आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस शिपायाने पत्नी, बहिणीवर गोळ्या झाडल्या; संपतीच्या वादातून हल्ला?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- संपत्तीच्या वादातून एका पोलिस शिपायाने पत्नी आणि बहिणीवर तीन गोळ्या झाडल्याची घटना शुक्रवारी नागपुरात घडली. प्रेमलता ब्राह्मणकर (39) असे मृत बहिणीचे नाव आहे, तर पत्नी रिता हिच्यावर उपचार सुरू आहेत.
राजेश ब्राह्मणकर (45) असे आरोपीचे नाव असून तो पत्नी रिता व मुलीसह राहतात. त्याच घरातील खालच्या ब्लॉकमध्ये बहीण प्रेमलता नत्थुलाल ब्राह्मणकरही राहतात. राजेश सध्या गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. नक्षलग्रस्त भागांत निवडणुकीसाठी पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. सध्या तेथे त्याची ड्यूटी आहे. गुरुवारी रात्री तो घरी परतला होता.

घराच्या मालकीवरून राजेश आणि प्रेमलता यांच्यात वाद होता. शुक्रवारी राजेश बाहेरून दारू पिऊन घरी परतला. या वेळी त्याचे व रिताचे कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रिताने प्रेमलताकडे राजेशबद्दल बोलणे सुरू केले. त्यामुळे राजेशने पत्नीला घरात बोलवून घेत स्वत:जवळील रायफल तिच्यावर रोखली. त्यामुळे प्रेमलता घरात आली. यादरम्यान राजेशने पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या. प्रेमलताने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्यावरही गोळी झाडली. यात प्रेमलता यांचा जागीच मृत्यू झाला.

रिताने केला भावाला फोन : रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्यानंतर रिताने आपला भाऊ नरेशचंद्र रामचंद्र लाल यांना फोन करून ‘‘राजेशने आपल्याला आणि बहिणीला गोळी मारली आहे. तू रुग्णवाहिका आणि पोलिसांना घेऊन घरी ये’’, असे सांगितले.