आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरु होता जुगार, पडला पोलिसांचा छापा... अन् गेला त्याचा जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - विश्वशीला कॉलनीत जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री तेथील गुरुवंदना अपार्टमेंटमध्ये धाड टाकली. यावेळी पोलिसांच्या भीतीने तिसर्‍या माळ्याच्या सज्जावरून उतरण्याच्या प्रयत्नात मनीष उत्तमराव पेठे (38) हा युवक खाली कोसळला. कारवाईसाठी आलेल्या पोलिसांनी दवाखान्यात नेण्याचे सौजन्य दाखवले नाही. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

तिसर्‍या माळ्यावरील अक्षय नाल्हे यांच्या फ्लॅट क्र. 304 मध्ये काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी जुगार्‍यांना पकडण्याच्या प्रयत्नात बाहेरून दरवाजा बंद केला. मनीष पोलिस आल्यामुळे धास्तावला. त्याने सज्जावरून उतरण्याचा प्रय} केला. त्यात तोल गेल्याने 38 फूट उंचीवरून खाली कोसळला. घटनेनंतर पोलिस गाडगेनगर ठाण्यात परतले. मनीषच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गाडगेनगर पोलिसांनी उशिरा रात्री घटनास्थळाची पाहणी केली. अक्षय नाल्हे यांना विचारणा केली. त्यांनी सांगितले, की पोलिसांनी आम्हाला आतील खोलीत नेऊन बाहेरून दरवाजा बंद केला. पोलिसांनीच पुन्हा दरवाजा उघडून दिला. आम्ही बाहेर आलो, तर मनीष पेठे खाली पडला होता.

पोलिसांच्या धास्तीनेच केला घात : पोलिस आल्यानंतर धावपळ झाली. भीतीमुळे सज्जावरून उतरण्याचा प्रय}ात तो खाली कोसळला, अशी माहिती आहे.

ठाणेदारांच्या आदेशानेच : 9.30 च्या सुमारास जुगार सुरू असल्याचे तब्बल चार निनावी कॉल ठाण्यात आले. पोलिस येणार नसतील, तर आम्ही धिंगाणा घालू, असे आम्हाला फोनवरून बजावण्यात आल्याने पोलिस उपनिरीक्षक ए. एस. पवार, बी. के. कोळी, परीविक्षाधीन उपनिरीक्षक जे. एम. ठाकूर, ईशय खांडे, प्रदीप कावरे आणि संजय सरोदे यांना पाठवल्याचे ठाणेदार सोळंके यांनी सांगितले.