आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Squad Action: Moist Camp Distroyed, Five Dalam Migrated

पोलिस दलाची कारवाई: माओवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त, पाच दलम कमांडरचे पलायन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - केंद्रीय राखीव पोलिस दल आणि गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने राबविलेल्या एका संयुक्त कोम्बिंग ऑपरेशनमध्ये माओवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आला. माओवाद्यांच्या चातगाव आणि पोटेगाव दलमने पोलिसांवर गोळीबार केला. दरम्यान पाच दलम कमांडर पळण्यात यशस्वी झाले. त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा पोलिस उपविभागाअंतर्गत असलेल्या खरकाडी गावाजवळील जंगलात ही भीषण चकमक शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास उडाली. पाच ते सात दिवसांपासून माओवादी जंगलातील कॅम्पमध्ये दबा धरून बसले होते. ही माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सीआरपीएफच्या मदतीने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. तेव्हा कॅम्पमध्ये असलेल्या माओवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही त्याला गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. पोलिसांचा दबाव वाढत असल्याचे बघून माओवादी खरकाडी, हेटीच्या दिशेने पळून गेले.