आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण अतृप्त आत्म्यांचा महासागर : गडकरींचे वक्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘राजकारण हे अतृप्त आत्म्यांचा महासागर अाहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्वच राजकीय नेते अतृप्त आत्मा अाहेत, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बौद्ध अध्यापन केंद्राच्या कोनशीला समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

राजकारणात सर्वचजण अतृप्त आहेत. परंतु मी त्यास अपवाद आहे. मी कधीच भविष्याबद्दल काळजी करीत नाही. नगरसेवकाला आमदार होण्याची इच्छा असते, आमदाराला मंत्रीपदाचा लोभ असतो, मंत्र्याला मुख्यमंत्रीपदाची आशा असते, पण सर्वांनाच त्यांच्या इच्छेनुसार पदे मिळत नाहीत.
त्यातून अतृप्त लोकांची संख्या वाढत जाते, असेही ते म्हणाले. राज्यात निकामी झालेल्यांना केंद्रात पाठवण्यात येते. केंद्रातही प्रभावहीन ठरलेल्यांना राजदूत बनवण्यात येते. या गटांत कुठेही न बसणा-यांसाठी राज्यपालपद आहेच, असेही परखड मत त्यांनी व्यक्त केले.