आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवस जातील, दिस येतील, भोग सरल, सुख येईल, दोन मुली घेताहेत अभियांत्रिकीचे धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजुरा बाजार - धराशायीझालेल्या अवस्थेत छाताडावर कर्जाचा डोंगर जोपासत दोन मुली अभियंता कशा होतील, याचाच ध्यास सध्या वाडेगाव (ता. वरुड) येथील अशोक अधव या मातीतील लढवय्या सेनापतीने घेतला आहे.
खर्च आणि उत्पादनाच्या तुलनेत फक्त भाव द्या. कीटनाशक, खतांच्या गर्दीत नेमके कोणते वापरावे त्याची माहिती द्या. विज्ञान, तंत्रज्ञानाची हवा धुऱ्यापर्यंत येऊ द्या. जगाचा अभ्यास करून भाव कोणत्या पिकाला मिळेल ते सांगा. मापारी, दलाली, मजुराच्या कचाट्यातून नफा वाचवा अन् मला मातीशी लढ म्हणायला सांगा, विजय माझाच आहे. अशा शब्दात अशोक अधव हा शेतकरी शेती व्यवसायातील व्यथा स्वत:ची कथा सांगत होता.

अशोक लक्ष्मणराव अधव. विदर्भातील इतर शेतकऱ्यांसारखाच कर्ज, नापिकीच्या जाळ्यात फसलेला. अधव यांना दोन मुली, एक मुलगा पत्नी असा परिवार आहे. मोठी मुलगी कांचन नागपूरच्या 'एनआयटी' पॉलिटेक्निकमध्ये दुसऱ्या वर्षाला इलेक्ट्रॉनिक्स शाखेत, तर दुसरी मुलगी रविना अमरावती येथील पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला मेकॅनिकल शाखेत शिकत आहे. मुलगा राहुल वरुडच्या महात्मा फुले महाविद्यालयात बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. शेती केवळ दोन एकर कोरडवाहू. यावर्षी त्यांनी २० हजार रुपयांनी दोन एकर शेती मक्त्याने केली होती. घरच्या दोन एकरांत त्यांना आठ क्विंटल कापूस, ८० किलो तूर, तर मक्त्याच्या शेतात क्विंटल कापूस ५० किलो तुरीचे पीक झाले. खर्च आणि उत्पन्नाची 'बॅलन्सशीट' कुठेच जुळत नाही. त्यातच मुलांचे शिक्षण शेतीसाठी छायाबाईने तीन ग्रॅम सोन्याच्या पोतीचा दागिनाही शेकडा तीन टक्क्यांनी १० हजार रुपयांमध्ये सोनाराकडे गहाण ठेवले.
सोसायटीचे १४ हजार, सवाई शेकडा पाच टक्के व्याज दराने ८० हजार रुपयांचा कर्जाचा डोंगर त्यांच्या छाताडावर आहे. मुलींना अभियंता करण्यासाठी अशोकराव पत्नी छायासह सध्या मजुरीला जाऊन सरासरी अडीचशे रुपयांच्या 'रसदी'वर मुलींच्या िशक्षणाची खडतर लढाई लढत आहे. दोन्ही मुली वसतिगृहात राहत असल्या, तरी मुलगा राहुलसह त्यांचा दैनंदिन शिकवणीचा खर्च अधव यांना भागवावा लागत आहे. केवळ चौथा वर्ग शिकलेले अशोकराव म्हणाले, 'सीमेवरची दुस्मनासोबतची लढाई काही दिवसांची असते. त्यांच्याजवळ आयुधं तरी असतात. सेना असते. सेनापती असते. पण सध्या कास्तकारीची लढाई प्रत्येक जण एकट्यानेच लढत आहे. हेच मोठं दुखणं आहे. रोजची लढाई लढताना बंदुकीत गोळ्या भरासाठीही पैसे राहत नाही. कसा जिंकणार कास्तकार. या लढाईसाठी लागणारी आयुधं पुरवा अन् फक्त लढ म्हणा. सर्वच संकटांना पाणी पाजण्याची धमक मातीतल्या माणसांत आहे. पण सर्वच कोणत्याही सोयी देता फक्त लढ म्हणतात, हेच मोठं दुखणं आहे.' शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर खर्चाचा योग्य मोबदला िमळण्याचा एकमेव उपाय असल्याचे ते म्हणतात. छायाबाई दुसरा वर्ग शिकल्या आहेत. त्या म्हणाल्या, 'लेकरं अभ्यासात हुशार हायत. सध्याच्या वाईट िदवसांची रातही कटनं मोठी मुश्कील होते.
चांगला दिवस कधी तरी उजाडणारच
परिस्थितीमुळे पोरी इंजिनिअरव्हाचं सपन तुटते की काय असे वाटते! पण पोरींसाठी दररोज जोमाने कामाला भिडतो. कधी तरी चांगला दविस उजाडणारच हाय. अशोकरावअधव, शेतकरी, वाडेगाव.