आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीन्स, टी-शर्ट घातल्याने वीज अभियंता निलंबित, ऊर्जामंत्र्यांच्या कारवाईने खळबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोजित केलेल्या आमसभेत जीन्स, टी-शर्ट आणि गॉगल घालून आलेल्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास तडकाफडकी निलंबित करण्यात आल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडच्या दौऱ्यावर असताना तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी गाॅगल घालून त्यांचे स्वागत केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावरून उठलेले वादंग अजून शांत झाले नाही तोच बावनकुळे यांनी ही कारवाई केली आहे.

विश्वजित हुमणे असे त्या अभियंत्याचे नाव आहे. हुमणे यांच्यावर आक्षेपार्ह वेशभूषा परिधान करण्यासोबतच कामात हयगय केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला असता कामात हयगय केल्यामुळे अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. त्यामागे इतर कोणतेही कारण नाही, असे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...